तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.

काल मी आणि श्री समर्थ असे दोघेच तळ्यावर फेऱ्या घालत होतो.बोलता बोलता मधुमेह ह्या व्याधीचा विषय निघाला.
“अलीकडे आपल्याकडे ह्या व्याधींचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे “असं मी समर्थांना म्हणालो.

“जशी देशाची श्रीमंती वाढत चालली आहे तशी अनेक जणांची खाण्याची सवय वृद्धींगत होत चालली आहे असं मला वाटतं. आणि हळूहळू एव्हडं जेवण घरी तयार करून ठेवण्यापेक्षा बाहेर उक्तं मिळत असेल तर बाहेर पैसे खर्च केल्यास घरी कष्ट कमी होतात.आणि बाहेर जेवण्याच्या सवयी वाढत असल्याने त्याची पुर्तता करण्यासाठी खाण्याच्या सोई वाढत आहेत. आणि सोई वाढत असल्याने जास्त रुचकर पदार्थ बनविण्यासाठी स्पर्धा वाढत आहेत. आणि रूचकर जेवण बनवण्याच्या स्पर्धेत तेल,साखर आणि मीठ या वस्तू सहजतेने वापरल्या जात असल्याने,अशा रुचकर पदार्थांच्या सेवनाने,चरबी आणि वजन वाढत चाललेलं आहे.त्यमुळे हृदय दाब वाढत चालला आहे.”

मला मधेच थांबवत श्री समर्थ म्हणाले,
“सामंत, तुम्ही हे सर्व सांगत असताना मला एक लक्षात आलं आहे की,”वाढत चाललं आहे “हे तुम्ही इतके वेळां वापरत आहात की,“कमी होत चाललं आहे “
हा वाकप्रचार तुम्ही जवळ जवळ विसरलेले दिसता आहात”

असं म्हणून समर्थ मिस्किल होऊन माझ्याकडे पाहत होते.आवंढा गिळून मी म्हणालो,
“असा कसा मी तो वाकप्रचार विसरेन?
अहो समर्थजी,“कमी होत चालला आहे”तो व्यायाम. आणि तेच कारण मधुमेह व्याधी वाढवण्यात हातभार लावतोय.“हिरव्या” वयात काही खाल्लं, कितीही खाल्लं
तरी चालतं पण “पिवळ्या आणि लाल” वयात शरिर साथ देत नाही ना! कुरकुरीत भजी,पाववडा,चपचपीत तूप घातलेला सांजा,बटाट्याची तेलात तळसलेली भाजी with पुऱ्या, हे असलं खाणं शरिराला झेपत नाही ना!
अहो समर्थजी,एकेका नेत्यांची राजकारण करत असताना चालताना पूढे आलेली पोटं बघा, अतिशयोक्ती नाही करत,साडी नेसून हे चालत असते तर दहा महिन्याची (नऊ महिन्यांचा वर) गरोदर बाई, delivery ला चालली आहे असं वाटेल.मी हे सर्व तुम्हाला सांगून मला Energy येई तो पर्यंत जरा गोड खातो.”
असं म्हणून समर्थजीनी साखरे बद्दल काही तरी सांगावं असं गृहीत धरे पर्यंत तेच म्हणाले,

“मला असं वाटतं की,आपण कदाचित जास्त साखर खातो. आणि मला खरोखर वाटतं की आपण परिष्कृत साखर (refined sugar) आणि त्या साखरेचे सर्व पदार्थ आणि साखरेला पर्याय म्हणून गोड करण्यासाठी वापरून बनवलेले पदार्थ खाणं का सोडलं पाहिजे हे ऐकण्यात तुम्हाला रस असेल.तुम्हाला वाटेल साखर सोडणं आणि साखरेचा पर्याय सोडणं कठीण आहे.पण हे काही आठवडे कठीण वाटेल पण नंतर तुमच्या जिभेवर गोड पणा भासवणारी जागा कमी कमी गोड चव दाखवत जाईल.जिभेवर गोडपणा वेगळ्या पातळीवर काम करील.आंबा,सफरचंद आणि संत्री यांसारख्या फळांची चव खूपच गोड वाटेल.तुम्हाला लक्षात येईल की तुमचे वजन टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला पुन्हा कधीही नियमातला आहार (diet) घ्यावा लागणार नाही.”

“पिवळ्या, लाल” वयात गेलेलो आम्ही दोघेही मधुमेह मुक्त असल्याचं कारण ह्या तळ्यावरच्या फेऱ्या असाव्यात ह्या मुद्द्यावर सहमत नसणं म्हणजे,तेल,साखर, मीठ खाऊन ही मधुमेह होत नसतो असं म्हटल्यास सारखं होईल.

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*