पुकार करी सर्वां ही कोकिळा

सजणा,ऐक जरा ऐक जरा की
पुकार करी सर्वां ही कोकिळा
बगिच्याना जरा तरी सांभाळा
आली घडी फुलांच्या बहराची

देठ फुलांचे गात आहेत हेच गीत
सख्याशी मिलन आले समिप
ही हवा कंठ शोष आहे करीत
कहाण्या ह्या सर्व प्रेमाच्या आहेत

बगिच्याना जरा तरी सांभाळा
पुकार करी सर्वां ही कोकिळा
आली घडी फुलांच्या बहराची

नको न्याहाळू मला असे
मर्जी तुझी माझ्यावर दिसे
नको करू मला बेचैन असे
माझी शपथ तुलाच असे

बगिच्याना जरा तरी सांभाळा
पुकार करी सर्वां ही कोकिळा
आली घडी फुलांच्या बहराची
सजणा, हे ऐक जरा,हे ऐक जरा

बगिच्यात उगवले श्रावण हिंदोळे
परिसर पाहून,मार्गस्थ मार्ग विसरे
वाटे मनात माझ्या,जीवन इथेच गुजरे

बगिच्याना जरा तरी सांभाळा
पुकार करी सर्वां ही कोकिळा
आली घडी फुलांच्या बहराची
सजणा,ऐक जरा, ऐक जरा

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*