मन ज्यां जवळी, होऊन जाऊ त्यांचे

मना रे मना भेट घे जरा त्या फुलांची
जुळवीतो हा परिसर, नजर ताऱ्यांची
रंग भरलेला परिसर, वाट पाहे वसंताची
हीच आहे तुझी माझी दुनिया स्वप्नांची

मना रे मना भेट घे जरा त्या फुलांची

समीप होती, अमाप ठिकाणे प्रीतीची
वर्तन करीतो, आपण मार्ग विसरण्याची
अगर मनाच्या नजरेमधून, तू पाहशील
राहीन मी तुझ्या समोर सदैव मुस्कुरत

मना रे मना भेट घे जरा त्या फुलांची

येऊन अचानक माझ्या स्मरणात
माझी निद्रा काबीज, तू करतेस
तुला मी बसवीले,माझ्या मनात
पण का अंग तुझे तूच लपवीतेस

मना रे मना भेट घे जरा त्या फुलांची

हे प्रेम गीत, आपण असता गात
हरवून जाऊं दोघे आपण ह्या मार्गात
हवे ते करावे आता जमान्याने
मन ज्यां जवळी, होऊन जाऊ त्यांचे

मना रे मना भेट घे जरा त्या फुलांची

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*