समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय खुपसून बसायला मला आवडतं.

“लोकांना समुद्र का आवडतो? याचं कारण असं की लोकांना ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतं त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती समुद्रात असते. असं कुणी तरी म्हटलं आहे.
माझा सागराच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, त्याहूनही अधिक, वाळूमध्ये बोटं खुपसून राहणं मला आवडतं.

समुद्रकिनारा हे एक मजेदार, घटना घडवणारं, खेळकर आणि अस्तव्यस्तीक ठिकाण आहे, त्याच वेळी ते आश्चर्यकारकपणे सुखद, शांत, उपचार करणारं ठिकाण आहे. सागराबद्दल असं काहीतरी आहे ज्याचं मी वर्णन करू शकत नाही, कदाचित ते खारं पाणी, वाळू किंवा ते वातावरण मला इतकं आवडतं तेच भरपूर आहे असं वाटतं असल्यामुळे असेल.असंख्य लोक समुद्र किनाऱ्यावर जातात. त्यांना ही ते वातावरण आवडत असावं.असं मला वाटतं.
आपण जीवन नुसतं जगत आहोत हे वास्तव सागर किनारा त्यांना विसरायला लावत असेल.
संसारी लोकांना अधुनमधून समुद्र किनाऱ्यावर जाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं.
समुद्रावर बसून विचार करायला वेळ मिळतो. समुद्र तुम्हाला स्वतःपासून दूर नेतो आणि तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवायला मदत करतो.
आणि माझ्या मते पायाची बोटं वाळूत खुपसून बसल्यावर वेळ कसा जातो हे कळत नाही म्हणून माझ्यसारखे बरेच लोक समुद्रावर जात असतील.”

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*