दोष कसा अंतराचा

(अनुवाद)
देऊ कसा दोष अंतराला जेव्हा
कोण कुणाशी प्रीती करते
न जाणे केव्हा कोण कुणाशी
प्रीती करते
उंच उंच महाला मधली छान छोकी
न माझ्या हाती,प्रिये,न तुझ्या हाती
पर्वताला मेघ जसे चिपकतात
जशा सागरात लाटा उसळतात
तशा चेहर्‍याअवर नजरा स्तब्ध होतात
हो,नजरा होत नाहीत स्तब्ध
दुनियेतल्या सर्व प्रसन्नतेवर,
देऊ कसा दोष अंतराला जेव्हा
न माझ्या हाती,प्रिये,न तुझ्या हाती
ये,माझ्या स्मरणामधे सर्व विसरूनी जाऊ
सार्‍या जगताला तुझीच प्रतीकृती बनवू
असेल जर माझ्या हाती अंतर चिरून दाखवू
तुझ्या नसा-नसातून रक्त प्रीतिचे वाहू

न माझ्या हाती,प्रिये,न तुझ्या हाती
देऊ कसा दोष अंतराला जेव्हा
कोण कुणाशी प्रीती करते

 

 

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*