कोणा कडेही नेमकं उत्तर असणार नाही.

हा पण एक वहीतला उतारा आहे.हा उतारा वाचत असताना मला आठवलं की त्या दिवशी आमच्या शेतात सकाळपासून कापणी चालू होती.बरेच उक्ते कामगार कापणीचं काम करायला आले होते.संध्याकाळ होईपर्यंत मी ही काम करून दमलो होतो.शेतात माणसं दिवसभर काम करत असतानाचं आठवून झोपण्याच्या तंद्रीत जाण्यापूर्वी हा उतारा मी वहीत लिहून ठेवला होता.

“मानवांनी पृथ्वीवर कितीही हाहाकार माजवला तरीही पृथ्वी आहे तिथेच असणार.आपण सगळेच इथे खात आहोत,काम करत आहोत,विचार करत आहोत आणि जगत आहोत.आपण केवळ योगायोगाने निर्माण झालो आहोत.जरी आपलं पृथ्वीच्या पृष्ठभागावरून निर्मूलन झालं तरही जग दीर्घकाळ टिकून रहाणार आहे.जग आपल्या आधीही इथं होतं.मानवजातीने हे लक्षात घेतले पाहिजे की जर ती जगातील संसाधनांचा सर्रास वापर करत राहिली तर ती नामशेष होईलसर्व विश्वात मानवाला विशेष भूमिका आहे आणि त्याच्या हातात संसाधनं आहेत त्याचा नीट वापर न झाल्यास एकंदर परिस्थितीत फरक पडू शकतो.तथापि,ज्यांना हे समजतं की आपण इथं कायमचे अस्तित्वात राहणार नाही तेच मानव जातीच्या तारणाच्या मार्गावर सक्षम असतील. एक शक्ती अस्तित्वात आहे जी आपल्या सभोवतालच्या जगातील सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये वास्तव करून असते.

आपण सर्व जीवनाच्या एका मोठ्या वर्तुळाचा भाग आहोत. कालांतराने सर्व सजीवांचा पुनर्जन्म दुसऱ्या अस्तित्वाच्या रूपात होईल.संभाव्यतः हा पुनर्जन्म दुसऱ्या अस्तित्वाचा किंवा अजैविक, कमी प्रभावशाली वाटणाऱा भाग म्हणून होईल.तथापि,जीवनात प्रत्येक गोष्टीचा एक उद्देश असतो आणि त्याचा सर्वोत्तम वापर केला जाऊ शकतो आणि केला पाहिजे. निसर्ग नेहमीच जे त्याचं होतं ते तो परत घेत असल्याने जे आहे त्याचा क्षय होऊन त्याचं दुसऱ्या अस्तित्वात रूपांतर होतं.सेंद्रिय पदार्थ वनस्पतींमधील एक भाग बनू शकतो किंवा जीवीत भाग एखाद्या अळीचा मांसपेशीचा भाग बनू शकतो.जीवनाचा अधिक भाग अनुभवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जीवनात असलेली विशेष गुणवत्ता शोधणं प्रत्येकजण शेवटी जीवनात त्यांचं स्थान निश्चित करतो.कोणाकडेही नेमकं उत्तर असणार नाही,,”

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*